मैत्रीची कविता खास तुझ्यासाठी ........
भेटत....
तो पण नाही,
भेटत...
मी पण नाही....
आशेवर ठेवण
त्याला पटत नाही.
निभवणे मला
जमत नाही,
फसवत
तो पण नाही,
फसवत
मी पण नाही....
त्याला एकटेपणाची
भीती आहे...
मला रुसण्याचे दु:ख
आहे,
समजत...
तो पण नाही,
रागवत.....
मी पण नाही......
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते
नेहमी
जेव्हा पण वेळ मिळाला कि,
मेसेज करते त्याला
बोलेन त्याच्याशी....
सांगत...
तो पण नाही,
ऐकत...
मी पण नाही....
पण एक गोष्ट
मात्र
खरी आहे,
मैत्री अजून कायम आहे आम्हाची,
नाकारत ..
तो पण नाही,
सांगत...
मी पण नाही
खूप खूप छान………. मस्त एकदम, भावना मनाला भिडतात.
ReplyDeletethank u sir
DeleteKhup chan
ReplyDelete