Friday, 6 November 2015

माझा गाव


पेपर, टीव्हीवर त्याचा नव्हता गाजावाजा
पण एकोप्याने नांदत होता पूर्वी गाव माझा

तेव्हा सुख दुःख दुसऱ्यांच, हाल-हवाल कळे
गावात कुणी वारल की सारा गाव हळहळे

खेळत असत लहान मोती मुल मैदानी खेळ
मुलांसारखा खुशीत जायचा मोठ्यांचाही वेळ

लग्न, तेरावी, आजारपणात कुणाचं न अडे काम
अडल्या नडल्यास उसना मिळे पै-पैसा, दाम

न सांगताच दुसर्यांची गरज कळत असे
कार्य प्रसंगात तरुण वर्ग धावत पळत असे
जरी जाती धर्मांचे उभे होते वेगवेगळे स्तंभ
एकोप्याने साजरे व्हायचे सण-समारंभ 

सांज-सकाळी देवळांमध्ये आरती रोज व्हायची
छोटी-मोठी निवडणूकही 'अनअपोज' व्हायची !

दुष्काळातही माणुसकीच नातं जपलं जायचं
गरजूंना कुणी धन, धान्य कुणी द्यायचं

मोबाईलच्या जमान्यात कालबाह्य तार-पत्र ....
काळानुसार बदलत गेलं माझ्या गावाचं चित्र !

प्रकाश बनसोड यांची ही कविता पेपर मध्ये वाचली आणि गावाच्या सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

आमचे गाव पण असेच होते. डोंगराच्या कुशीत वसलेले. गावाच्या जवळच उरमोडी नदी होती आणि गावाच्यामागे आंब्या-जांभळाची झाडे आणि आमच्या घरासमोर आमचे अंगण म्हणजे आमचे शेत होते. त्यावर आम्ही खूप खेळायचो आणि आमच्याबरोबर खेळण्यासाठी चुलत चुलते, आत्या होत्या. ते सर्वजण आमच्यापेक्षा थोडेच मोठे होते.  शनिवार-रविवार मी आणि माझी मोठी बहिण गावाला जायचो खूप धमाल करायचो. सर्वजण मिळून अंगणात लपाछपी, आंधळी कोशिंबीर, पकडापकडी असे बरेच खेळ खेळायचो. मे महिन्यात तर खूप मजा यायची. सर्वाना सुट्ट्या असल्यामुळे सर्वजण एकत्र यायचे. काका-काकू, मामा-मामी, आत्या आणि सर्व भावंडे एकत्र यायचो. दिवसभर खेळायचे, आंबे-जांभळे आणण्यासाठी जाणे, नदीवर पोहायला जाणे आणि रात्री बैठे खेळ खेळणे. दिवस कसा जायचा कळायचे देखील नाही. अश्या खूप आठवणी आहेत ज्या शब्दात सांगणे कठीण आहे. आमच्या गावाचे पुनर्वसन झाले आणि उरमोडी नदी धरणामध्ये रूपांतरित झाली. सर्व काही बदललेले, नवीन गावी ना डोंगर, ना नदी, फक्त उनाड माळ रान. 

आठवणी ह्या अश्या का असतात? 
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या 
नकळत ओंजळ रिकामी होते,
आणि मागे उरतो फक्त ओलावा 
प्रत्येक आठवणींचा !!!!

Saturday, 24 October 2015

मगर ...


एक छान कविता आहे, पण माझी नाही आवडली म्हणून शेअर करत आहे.

" प्यार "
सभी करते है मगर ...
कोई दिल से करता है तो ...
कोई दिमाग सें करता है

" दर्द "
सभी इंसानो मे है
मगर ...
कोई दिखाता है तो ...
कोई छुपाता है .....

" अहसास "
सबको होता है मगर ...
कोई मेहसूस करता है तो ...
कोई समज नही पाता


शर्त लगी थी "दुनिया"को
एक लब्ज़ मे लिखने की....
वो किताबे ढुँढते रह गये
मैंने "बेटी" लिख दिया......!!!

" हमसफर "
सभी है मगर ...
कोई साथ देता है तो ...
कोई छोड देता है .....

" रिश्ता "
कई लोगों से होता है , मगर ...
कोई प्यार से निभाता है तो ...
कोई नफरत से निभाता है ..

"इंसानियत"
दिल में होती है,
हैसियत' में नहीं..!

उपरवाला 'कर्म' देखता हैं,
वसियत' को नहीं.!!. 


©

Monday, 19 October 2015

मैत्रीची कविता खास तुझ्यासाठी......



 मैत्रीची कविता खास तुझ्यासाठी ........ 

भेटत....
तो पण नाही,

भेटत...
मी पण नाही....

आशेवर ठेवण
त्याला पटत नाही.

निभवणे मला
जमत नाही,

फसवत
तो  पण नाही,

फसवत
मी पण नाही....

त्याला एकटेपणाची
भीती आहे...

मला रुसण्याचे दु:ख
आहे,

समजत...
तो पण नाही,

रागवत.....
मी पण नाही......

कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी

जेव्हा पण वेळ मिळाला कि,
मेसेज करते त्याला
बोलेन त्याच्याशी....

सांगत...
तो पण नाही,

ऐकत... 
मी पण नाही....

पण एक गोष्ट मात्र
खरी आहे,
मैत्री अजून कायम 
आहे आम्हाची,

नाकारत ..
तो पण नाही,

सांगत...
मी पण  नाही


Thursday, 15 October 2015

माझ्याबद्दल काही

मी कोणी लेखक किंवा विचारवंत नाही, एक सामान्य व्यक्ती आहे तुमच्यासारखी, मराठी ब्लॉग वाचून मला असे वाटायला लागले कि आपण काही तरी करावे आपला ब्लॉग असावा म्हणून मी हा ब्लॉग ओपन केला आहे. मला तुम्ही सर्वजन समजुन घ्या बाकी काही नको मला. मला जे काही सुचले तर मी नक्की पोस्ट करीन. धन्यवाद